एस टी कर्मचार्यांच्या संपावर खासगी वाहनांचा उतारा !

एसटी कर्मचारी कामबंद आंदोलन मुळे प्रवाशांचे हाल

  एसटी कर्मचार्यांनी विविध मागण्या संदर्भात  पुकारलेल्या कामबंद आंदोलनानंतर खासगी प्रवासी वाहतुकदारांनी सुरु केलेली लुटमार नियंत्रणात आणून कोणाचेही गैरसोय होऊ नये, यासाठी परिवहन विभागाचे (एमएच १६) आतापर्यंत ९७४ वाहने प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संपावर खासगी वाहने परिणामकारक उतारा ठरली आहे.

 

 

 

 

 

           सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या पुणे रोड  बसस्थानकावर परिवहन विभागाचे दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरु आहे. चार सहाय्यक वाहन निरीक्षक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ते  प्रवाशांना वाहने मिळुन देणे , लुटमार होणार नाही, याची काळजी घेत खासगी वाहन धारकांचा तशाच सूचना देणे आदी कामे करीत आहेत.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

 

            शहरातील माळीवाडा आणि तारकपूर बसस्थानकांवर प्रत्येकी दोन सहाय्यक वाहन निरीक्षकांच्या  नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तालुका स्तरावर बस स्थानकावर प्रवाशांची तितकीशी गर्दी नसते. त्यामुळे तालुकास्तरावर प्रत्येकी एक सहाय्यक वाहन निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना नेमणुका देण्यात आलेल्या आहेत.

 

 

 

 

 

           एसटी  कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारतच, प्रवाशांचे मोठे हाल सुरु झाले. तसेच या संधीचा नामी फायदा घेत खासगी प्रवासी वाहतुकदारांनी  अव्वाच्यासव्वा भाडे वसुली सुरु केली होती. त्यावर नियंत्रण  मिळवण्यासाठी उपप्रदेश परिवहन अधिकारी उर्मिला पावर यांनी  टूल्स आणि ट्रव्हल्स बस असोसिएशन, स्कूल बस असोसिएशन आणि इतर खासगी प्रवासी वाहतूकदार वाहनांच्या चालक- मालक यांची बैठक घेतली. प्रवाशांची अडवणूक होऊ नये , याची खबरदारी घेण्याच्या सूचना देत  कार्यालयात १४ सहाय्यक वाहन बसस्थानकावर नियुक्त केल्या. दि. ९ नोव्हेंबर पासून १६७ खासगी बसेस , ५८ स्कूल बसेस, ४४९ खासगी वाहने, ३०० इतर वाहने प्रवाशांच्य सोयीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.