लेखिका सुनिता पालवे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान

निमगाव वाघा येथील धर्मवीर सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट

 

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राराज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2021 लेखिका सुनिता एकनाथ पालवे यांना देण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पालवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब जाधव, जयदत्त आव्हाड, पै. संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.

हे ही पहा आणि सबस्क्राईब  करा.

लेखिका सुनिता पालवे या पाथर्डी तालुक्यातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात ग्रंथालय परिचर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द झाली असून, साहित्य क्षेत्रात त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. पालवे यांनी     सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, प्राचार्य जी.पी. ढाकणे, ग्रंथपाल किरण गुलदगड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच लेखिका पालवे यांनी निमगाव वाघा येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट दिली.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………....