Facebookdown

फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद पडल्याने अनेकांचे धाबे दणाणले

फेसबुक इंस्टाग्राम अचानक बंद पडल्याने अनेकांचे धाबे दणाणले एकमेकांना विचारून सोडले भंडावून आता काय होणार याचीच लागले चिंता 

फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप चा मालक मार्क Zuckerberg आणि त्याची पत्नी एका विवाह सोहळ्यासाठी भारतात आलेले असताना अचानक फेसबुक आणि इंस्टाग्राम चे अकाउंट बंद पडल्याने अनेकांचे धावे दणाणले आहेत.

आता पुढे काय होणार याची चिंता सर्वांना आहे. सवयीप्रमाणे अनेकांनी आपले फेसबुक अकाउंट उघडतात तेथे मोबाईलवर लॉगिन सेशन एक्सपायर असा मेसेज आला तर इन्स्टा चे अकाउंट हँग होऊन बंद पडले. काहींनी आपले जे व्हिडिओ डाऊनलोड केलेले आहेत ते पुढे जातात पण पुढचे व्हिडिओ प्ले होत नाहीत.
फेसबुकचे अकाउंट तर पासवर्ड लॉगिन केला किंवा फरगेट पासवर्ड केला तरी ते पुढे जात नाही त्यामुळे अनेकांना चिंता लागलीच आहे.

असे का झाले याबद्दल माहिती घेण्यास कोणताही पर्याय नाही पण मार्ग झुकेरबर्ग यांना काही विचारता येते का अशी अपेक्षा नेटकरी व्यक्त करत आहेत. 

मार्क झुकेरबर्ग आणि त्याची पत्नी गुजरात मधील जामनगर येथे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा निमित्त आलेले आहेत त्यामुळे त्यांना कुणीतरी विचारा असे नेटकरांनी म्हटले
फेसबुक इन्स्टा बरोबर व्हाट्सअप देखील मार्क झुकेरबर्ग यांच्याच मालकीचे आहे. त्यामुळे तेही बंद पडेल का ? अशी भीती व्यक्त करतात.
वास्तविक फेसबुक ,इन्स्टा, व्हाट्सअप चालवणारी एक कंपनी आहे त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असू शकतो किंवा सर्व्हर hang होऊ शकतो किंवा सायबर अटॅक हि असू शकतो नक्की काय ते अजून कोणाला समजले नाही पण फेसबुक इन्स्टा का चालू होत नाही त्यामुळे अनेकांची धडधड वाढली आहे अशातचFacebook insta hacked नेटकरी तीनदा तीनदा उघडून बघत आहेत जोपर्यंत फेसबुक इन्स्टा सुरू होत नाही तोपर्यंत सो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले युजर्स शांत होणार नाहीत हे निश्चित