अंबानींच्या कार्यक्रमानंतर शाहरुख खानवर भडकले रामचरणचे चाहते; नेमकं काय आहे प्रकरण?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. रविवारीच हा तीन दिवसांचा कार्यक्रम संपला. मात्र त्यानंतरही कार्यक्रमाची चर्चा अद्याप सुरूच आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये हा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना आता प्रकाशझोतात आली आहे. साऊथ सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासनाच्या मेकअप आर्टिस्टने शाहरुख खानवर आरोप केला आहे.प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी ‘RRR’ या सुपरहिट चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स केला. तेव्हा शाहरुखने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रामचरणला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावलं. रामचरणला स्टेजवर बोलावताना शाहरुखने मस्करीत त्याला ‘इटली वडा’ असं म्हटलं. त्यावर रामचरण काहीच बोलला नाही. मात्र त्याच्या पत्नीची मेकअप आर्टिस्ट आणि रामचरणचे चाहते चांगलेच भडकले आहेत.

अभिनेता रणदीप हुडाची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील एक-एक दृश्य अंगावर काटा आणणारा असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. क्रांतिकारी नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये खुद्द रणदीपनेच सावरकरांची भूमिका साकारली आहे. ‘हम सबने पढा है की भारत को आझादी अहिंसा से ही मिली है. यह वो कहानी नहीं है’, या दमदार डायलॉगने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. सावरकर यांनी कशा पद्धतीने अखंड भारताची लढाई लढली, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी कशापद्धतीने आपली फौज उभी केली हे यातून पहायला मिळणार आहे.