‘नारळ’ तयारीत फडणवीस! मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट?
मुंबई – महायुती सरकारमध्ये मोठी राजकीय खळबळ उडवणारी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच आपल्या मंत्रिमंडळात बडतर्फीची मोठी मोहीम राबवू शकतात. वादग्रस्त, निष्क्रिय आणि घोटाळ्यांत अडकलेल्या मंत्र्यांना “घरचा रस्ता” दाखवण्याची तयारी सुरू आहे!

वादग्रस्त चेहरे कोण?
शिवसेनेचे संजय शिरसाट – बेडरूममध्ये सिगारेट, रोख पैशांची बॅग, आणि इन्कम टॅक्स नोटीस.
संजय गायकवाड – विधान भवनच्या कँटीनमध्ये मारहाण!
योगेश कदम – मातोश्रीच्या बारवर छापा, बारबालांचे नृत्य!
भरत गोगावले, संजय राठोड – देखील वादात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे – सभागृहात ‘रम्मी’ खेळत पकडले गेले.
नरहरी झिरवळ यांच्यावरही बोट.
भाजपचे गोपीचंद पडळकर – गुन्हेगाराला थेट विधिमंडळात आणल्याचा आरोप.
फडणवीस सरकारची इमेज खराब होत असल्याने निवडणुकांपूर्वी damage control ची मोठी तयारी सुरू आहे.
काय होणार पुढे?
गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळातून बाहेर करून संघटनेत जबाबदारी दिली जाण्याची शक्यता.
राहुल नार्वेकर – नव्या मंत्रिपदासाठी चर्चेत!
सुधीर मुनगंटीवार – नवीन विधानसभा अध्यक्षपदाची शक्यता.
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस ‘image makeover’च्या तयारीत! महत्त्वाचे चेहरे हटवून, तरुण आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी दिली जाणार?
महायुती सरकारमध्ये मोठा ‘पोलिटिकल रिफ्रेश’ येणार? कोण उरेल, कोण जाईल – पाहा आपल्या METRO PORTAL वर!