मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील ‘निर्दोष’ सुटलेले आरोपी पुन्हा अडचणीत! सुप्रीम कोर्टाची मोठी कारवाई 

१ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपींना निर्दोष सोडले. 

🚨
 मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील ‘निर्दोष’ सुटलेले आरोपी पुन्हा अडचणीत! सुप्रीम कोर्टाची मोठी कारवाई 🔥

📍 नवी दिल्ली / मुंबई – ११ जुलै २००६ ला मुंबई लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. २०९ जणांचा मृत्यू आणि ७१४ लोक गंभीर जखमी! या भयानक घटनेनंतर १२ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, २१ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपींना निर्दोष सोडले. 😱

👨‍⚖️ उच्च न्यायालय म्हणालं – पुरावे ठोस नाहीत, साक्षीदारांच्या साक्षांवर विश्वास ठेवता येत नाही, बॉम्ब कुठून आले हेच स्पष्ट नाही! म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर आणि एस. चांडक यांच्या खंडपीठाने निर्णय दिला – “सर्वजण निर्दोष!”

😮 पण आता या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने ब्रेक लावला! महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेत याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाने लगेच त्या निकालावर स्थगिती दिली आहे.

📩 कोर्टाने सर्व आरोपींना नोटीस पाठवली असून, “सध्या तुम्हाला पुन्हा तुरुंगात पाठवणार नाही, पण पुढील सुनावणीत बाजू मांडावी लागेल” असा स्पष्ट संदेश दिलाय.

🔎 या प्रकरणावर देशभरातून लक्ष आहे – बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी कोण? चूक कोणाची? आणि १५ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिलेल्यांना खरंच न्याय मिळतोय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

📢 अपडेट्ससाठी जोडलेले रहा…