श्रीरामपूरमध्ये बनावट दारूचा ‘मिनी फॅक्टरी’ उघडकीस!
"भिंगरी संत्रा" देशी दारूचा स्कॅम! 3 जेरबंद, 3 फरार 🚨
श्रीरामपूरमध्ये बनावट दारूचा ‘मिनी फॅक्टरी’ उघडकीस!
“भिंगरी संत्रा” देशी दारूचा स्कॅम! 3 जेरबंद, 3 फरार 
श्रीरामपूर | २ जुलै
श्रीरामपूरच्या भैरवनाथनगरमधील कदम वस्तीत एक पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकत मोठा गौडबंगाल उघड केला आहे! “भिंगरी संत्रा” नावाने बनवली जात असलेली बनावट दारू, हजारो रुपयांचे स्पिरीट आणि रसायने पोलिसांनी जप्त केली आहेत.
छापा टाकला तेव्हा काय सापडलं?
- भरदिवसा ३ तरुण ‘स्पिरीट + केमिकल’ मिक्स करत होते
- तयार दारू बाटल्यांमध्ये भरली जात होती
- बॅच नंबर, लेबल, सिलिंग मशीन – सगळं प्रोफेशनल!
जप्त मुद्देमाल – 1.66 लाखांचा स्कॅम!
- २८९ तयार बनावट बाटल्या
![🍾]()
- ५३० रिकाम्या बाटल्या
- सिलिंग मशीन, लेबल्स, फ्लेवर, स्पिरीट ड्रम
- केमिकल मिक्सिंगचं सेटअप
- वाहतुकीसाठी मोपेड गाडी
![🚲]()
- अंदाजे ₹५०,००० चं स्पिरीट जागेवर नष्ट
अटक झालेले आरोपी –
- मोसिन इक्बाल सय्यद (२४)
- अरवाज अनिस मलंग (२५)
- अन्वर शब्बीर शहा (४७)
फरार आरोपी –
- प्रमोद फुलारे
- राहुल फुलारे
- लता महादू राऊत (घरमालक महिला)
पोलीस अपील –
“तुमच्या भागात बनावट दारू विकली जात असल्याचा संशय आल्यास तातडीने संपर्क करा. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल.” – PI नितीन देशमुख
अजून कोण मास्टरमाइंड आहे? बनावट दारू कुठे विकली जात होती? याचा तपास सुरू आहे.
#FakeLiquorFactory #ShirampurNews #BreakingNews #BhingariScam #LiquorRaid #MetroNewsUpdate #देशीदारूगुन्हा #व्हायरलबातमी


