Breaking!
“2 दिवसांत संपवणार!” – आमदार संग्राम जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी ![😱]()
![🔥]()
अहिल्यानगर – शहरात खळबळजनक घडामोड! हिंदुत्वाचा ठाम आवाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. ही धमकी मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आल्याने राजकीय आणि पोलिस यंत्रणेत एकच हलकल्लोळ उडाला आहे!
ही घटना 2 जुलै रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. आमदारांचे खासगी सहाय्यक सुहास शिरसाठ हे मार्केटयार्ड चौकात असताना त्यांना एक अनोळखी नंबरवरून धक्कादायक मेसेज आला –
“Sangram Jagtap को दो दिन के अंदर खत्म करूंगा”
शिरसाठ यांनी लगेच कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस सायबर टीमकडून त्या नंबरचा माग काढला जात आहे.
काय आहे पोलिसांचा पुढील प्लॅन?
धमकीचा स्त्रोत शोधणे
आमदारांच्या सुरक्षेचा आढावा
सायबर युनिटची मदत
सुरक्षा वाढवण्यात आली असून या धमकीमागे कोण आहे, याचा तपास गतीने सुरू आहे.
#SangramJagtap #DeathThreat #Ahilyanagar #PoliticalNews #BreakingNews #MetroBulletin



