बनावट लग्न… खऱ्या भावनांची फसवणूक!

🎭 अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश – श्रीगोंदा पोलिसांची जबरदस्त कारवाई

🚨
💔 बनावट लग्न… खऱ्या भावनांची फसवणूक!
🎭 अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश – श्रीगोंदा पोलिसांची जबरदस्त कारवाई

📍 श्रीगोंदा, 16 जुलै 2025
तुम्ही ऐकलंय का? लग्नाच्या नावाखाली थेट 3 लाखांची फसवणूक!
श्रीगोंदा तालुक्यातील एका तरुणाशी बनावट नात्याचं नाटक करून बनावट नवरी आणि तिच्या ‘मावस भावाने’ घरातली रोख रक्कम लंपास केली आणि गायब झाले! पण पोलिसांनी या फसवणुकीच्या नाटकाला अखेर पडदा पाडला.


👮‍♂️ श्रीगोंदा पोलिसांची शाबासकीची कारवाई:
🔗 रोहित रमेश तरटे (वय 28, घोगरगाव) या तरुणाने एजंटच्या माध्यमातून 3 लाख रुपये देऊन बुलढाण्यातील मुलीशी 14 डिसेंबर 2024 रोजी आळंदी देवाची, पुणे येथे साधं लग्न केलं.
👰‍♀️ लग्न केलं, काही दिवस घरात राहिली आणि मग रोख रक्कम घेऊन नवरीच पळाली!
😱 तब्बल 6 महिन्यांनी लक्षात आलं – हे सगळं बनावट होतं!


🕵️‍♂️ क्लू मिळताच पोलिसांची गुप्त मोहीम सुरू झाली.
📍 बुलढाणा व संभाजीनगरमध्ये सापळा रचून पोलिसांनी दोघांना –
1️⃣ आकाश सुरोशे (31 वर्षे)
2️⃣ बनावट नवरी – अटक केली!
🛑 मात्र 3 साथीदार अजूनही फरार:
🔺 शिवाजी राठोड
🔺 ऋषाली ठाकूर
🔺 (एक सुरोशे – पूर्ण नाव अज्ञात)


💣 थरकाप उडवणारी माहिती:
हीच टोळी राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातही अशाच प्रकारची फसवणूक करून पोबारा करत होती.
📌 पोलिस तपासात निष्पन्न झालं की ही एक संगठित आंतरराज्यीय फसवणूक टोळी आहे जी प्रेम, लग्न आणि विश्वासाचं नाटक रचून तरुणांची आर्थिक लूट करत होती.

⚖️ अटक झालेल्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


👮‍♀️ ही कामगिरी केवळ शक्य झाली श्रीगोंदा पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चमूच्या मेहनतीने:
👏 संग्राम जाधव, संदीप शिरसाठ, रवि जाधव, संदीप राऊत, अरुण पवार, संदीप आजबे, मयूर तोरडमल, अलका वाघ – खाकीचा अभिमान!


 

🛡️ Metro Portal Exclusive:
❌ बनावट नवऱ्या-नवरींना आता थेट जेलमध्ये “सात फेरे”!
🧠 लग्नाआधी नातं नाही – नोंदणी बघा, नात्याची शहानिशा करा!