जामखेड तालुक्याच्या ‘कला’ नेतृत्वाची कमान आता मयूर भोसले यांच्याकडे!

🌟 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरणारे शिक्षक आता संघटनेचे नवे अध्यक्ष

🎨
🔥 जामखेड तालुक्याच्या ‘कला’ नेतृत्वाची कमान आता मयूर भोसले यांच्याकडे!
🌟 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरणारे शिक्षक आता संघटनेचे नवे अध्यक्ष

📍 जामखेड, 16 जुलै 2025 –
जामखेडच्या कलाक्षेत्रात मोठी घडामोड!
🎨 मयूर कृष्णाजी भोसले यांची जामखेड तालुका कला शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे.
🔥 विशेष म्हणजे हेच ते भोसले सर – ज्यांनी India Book of Records आणि Asia Book of Records मध्ये आपल्या नावाची नोंद करून जामखेडचं नाव देशभर पोचवलं!

👥 12 जुलैला ल.ना. होशिंग विद्यालयात पार पडलेल्या सहविचार सभेत निवड झाली.
ज्येष्ठ शिक्षक मुकुंद राऊत यांनी ठराव मांडला आणि सर्व कलाशिक्षकांनी एकमताने भोसले सरांना अध्यक्षपदासाठी निवडले.


🆕 नवीन कार्यकारिणी असा दिसतो:

  • 🧑‍🎨 अध्यक्ष: मयूर भोसले
  • 🔹 उपाध्यक्ष: त्रिंबक लोळगे, संतोष म्हस्के
  • 🖋️ सचिव: विकास जाधव, सूरज डाडर
  • 💰 खजिनदार: संजय वस्तारे
  • 👩‍🏫 महिला प्रतिनिधी: संगीता दराडे
  • 🌟 मार्गदर्शक: दीपक तुपेरे, रविंद्र कोरे
  • 📍 जिल्हा प्रतिनिधी: अशोक बोराटे

💬 जिल्हा संघटनेचे संस्थापक संजय पठाडे आणि अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी दिल्या मन:पूर्वक शुभेच्छा!
📢 “नवीन कार्यकारिणीने संघटना बळकट करावी, विद्यार्थ्यांसाठी नवे उपक्रम घ्यावेत,” असा विश्वास व्यक्त केला.


 

📌 तुम्हाला माहीत आहे का?
जामखेड तालुक्यात ग्रेड चित्रकला परीक्षासाठी ३ प्रमुख केंद्रं आहेत:
🎯 जामखेड (23 शाळा), खर्डा (7 शाळा), नान्नज (7 शाळा)