तीन वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगचे केवायसी करणे आवश्यक

चेसिस क्रमांक जोडणे अनिवार्य

नवी दिल्ली : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 1 ऑगस्टपासून फास्ट टॅगचे नवीन नियम लागू केले. या अंतर्गत आता फास्ट टॅगसाठी केवायसी करणे बंधनकारक आहे. तीन ते पाच वर्षे जुन्या फास्ट टॅगसाठी केवायसी आवश्यक असेल. पाच वर्षांपेक्षा जुने फास्टटॅग बदलणे आवश्यक आहे. शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. एनपीसीआयने म्हटले आहे. एक ऑगस्टपासून सर्व फास्टटॅगना वाहन नोंदणी व चेसिस क्रमांक जोडणेदेखील अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन वाहन मालकांनी वाहन खरेदी केल्यानंतर 90 दिवसांच्या आत नोंदणी क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.