अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग बांधवांची आर्थिक लूट? 

प्रशासनाचे डोळेझाक - नागरिकांचा संताप उफाळला!

🛑
 अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिव्यांग बांधवांची आर्थिक लूट? 💸
📍प्रशासनाचे डोळेझाक – नागरिकांचा संताप उफाळला!

अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग बांधवांची अक्षरशः लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 🧑‍🦽💔

🎯 काय आहे प्रकरण?
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात एक खासगी इसम थेट कॉम्प्युटर लावून दिव्यांग बांधवांना ऑनलाईन प्रमाणपत्र देतो आणि त्यासाठी प्रत्येकी ₹१५० शुल्क घेतो. हे सगळं सर्रासपणे, उघडपणे आणि बिनधास्त सुरू आहे. 🤯

👉 विशेष म्हणजे, ही सेवा सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृतपणे सुरू केलेली नसूनही, हा खासगी इसम कोणाच्या परवानगीने हॉस्पिटलच्या आवारात बसतोय, याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 🤨

👁️‍🗨️ प्रश्न उपस्थित करणारे मुद्दे –

  • हा इसम रोज किती जणांकडून पैसे घेतोय? 💰
  • ही रक्कम कोणाच्या खिशात जाते? 🧾
  • प्रशासन कुठे आहे? 👀
  • सिव्हिल सर्जन व आर.एम.ओ. यांची भूमिका काय? ❌

🍽️ फक्त हेच नाही!
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात अनेक अनधिकृत हॉटेल्सहातगाड्या, आणि उघड्यावर अन्न विक्री सुरू आहे. ह्या ठिकाणी आरोग्य नियमांचे तीनतेरा वाजलेले दिसून येत आहेत. 🤢

📢 दिव्यांग बांधवांची व्यथा:
“आम्ही प्रमाणपत्रासाठी आलोय, पण इथे आम्हाला आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते. हे सगळं पाहून वाटतं की, आपलीच व्यवस्था आपल्यावर अन्याय करत आहे.” – एका दिव्यांग बांधवाचे दुःखद अनुभव 🙍‍♂️💔

🗣️ एका अधिकाऱ्याने कबुल केलं की, “दिव्यांग बांधवांना इकडून तिकडे हेलपाटे घालावे लागतात, त्यामुळेच ते खासगी इसमाला पैसे देतात.” पण प्रश्न असा आहे की, सरकारी यंत्रणा कुठे आहे?

⚠️ या सगळ्याच्या मुळाशी कोण?
हा इसम कोण आहे? तो कुणाच्या संमतीने तिथे बसतो? सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनच त्यामागे आहे का? की कोणीतरी वरची मर्जी चालते आहे?

📌 लोकांची मागणी –
➡️ या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
➡️ दोषींवर कठोर कारवाई व्हावी
➡️ दिव्यांग बांधवांसाठी फुकट व सुलभ सेवा उपलब्ध व्हावी

🙏 अशीच चालू राहिली तर दिव्यांग बांधवांसाठी रुग्णालय नव्हे, तर शोषण केंद्रच ठरेल!

 

🆘 सिव्हिल प्रशासनाला जागे करा, अन्यथा जनतेचा रोष पेटेल! 🔥
#DivyangLoot #CivilHospitalScam #Ahilyanagar #DivyangRights #MetroNewsVirals #AdminFailure #VoiceOfTheVoiceless 🧑‍🦽📢