न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार! आमदाराचा भाऊ अटकेत – कलाकारांमध्ये खळबळ, पोलीस तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
दौंड | 21 जुलै, मध्यरात्र – वाखरी गावातील न्यू अंबिका कला केंद्रात ‘लावणी की डीजे’ या किरकोळ वादातून थेट गोळीबार झाला आणि संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे वळले.


दौंड | 21 जुलै, मध्यरात्र – वाखरी गावातील न्यू अंबिका कला केंद्रात ‘लावणी की डीजे’ या किरकोळ वादातून थेट गोळीबार झाला आणि संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे वळले.
चार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यात एक सत्ताधारी आमदाराचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी चंद्रकांत मारणे अद्याप फरार आहे.
त्या रात्री केंद्रात एक पार्टी सुरू होती, महिलाही उपस्थित होत्या. नाचताना अचानक बाळासाहेब मांडेकरने बंदूक काढली आणि हवेत गोळी झाडली. या गोळीचे ठसे भिंत व छतावर सापडले आणि फरशीत गोळीचा तुकडा देखील पोलिसांनी जप्त केला.
हे प्रकरण सुरुवातीला लपवण्याचा प्रयत्न झाला, पण माध्यमांच्या सक्रियतेमुळे सत्य बाहेर आलं. रोहित पवार यांनी आवाज उठवत सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला.
अजित पवार म्हणाले, “गोळी हवेत झाडली, कोणी जखमी नाही.” पण जखमी महिला कलाकार असल्याची चर्चा अजूनही सुरूच आहे.
आता सोशल मीडियावर एकच आवाज – खरी माहिती समोर यावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
गोळी हवेत का झाडली? कलाकारांच्या जीवाशी खेळ कुणाच्या आशीर्वादाने?
#AmbikaShootout अपडेट | अजित पवार म्हणतात – गोळी हवेत झाडली, महिला बेशुद्ध!
राज्यभर खळबळ!
दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया!
“तिथे हवेत गोळी झाडली गेली, गोळी लागली नाही. पण गोळीबार पाहून एक महिला बेशुद्ध पडली होती. तिला पाणी देऊन शुद्धीवर आणलं!” – अजितदादा
MCOCA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो का तेही पाहत आहोत, असंही त्यांनी ठणकावलं.
पवार म्हणाले –
“या प्रकरणात कोणीही जखमी नाही, आणि राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी मी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”
ज्याचं नाव घेतलं जातंय, तो आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ नाही, चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे, तरी कोण असला तरी गुन्हा केल्यास अटक होणारच! – अजित पवार
अजितदादांनी शस्त्र परवाना होता का?, याचीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला जाब विचारत आवाज उठवला होता आणि माध्यमांनी विषय तितक्याच ताकदीने उचलून धरला.
आता सगळ्यांची नजर –
- जखमी महिला कलाकार आहे का?
- पोलिस तपास किती पारदर्शक होतोय?
- सत्ताधाऱ्यांचा दबाव किती आहे?


21 जुलै रोजीच्या रात्री न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलंय!
आमदार रोहित पवार थेट आक्रमक!
“या प्रकरणात पोलीस खरी माहिती लपवत आहेत, आणि सत्ताधाऱ्यांचा जबरदस्त दबाव आहे” – असा आरोप करत त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला!
रोहित पवार म्हणाले –
“आम्हाला माहिती मिळाली आहे की, एका महिला कलाकाराला गोळी लागली आहे! ती सध्या दवाखान्यात आहे का? तिचे फोटो, व्हिडीओ आमच्याकडे आले तर आम्ही ते जनतेसमोर मांडू!”
शंका हीच की –
- सुरुवातीला पोलिस म्हणाले, घटना झालीच नाही
- नंतर चार आरोपींवर गुन्हा दाखल
- आता आरोप – पोलिसांनी मालक व कलाकारांचे जबाब दबावाखाली घेतले?
या प्रकरणात सहभागी आरोपींपैकी एक सत्ताधारी आमदाराचा भाऊ असल्याचीही माहिती रोहित पवारांनी दिलीय.
“कोणताही आमदार म्हणा किंवा त्याचा भाऊ – गुन्हा केला तर शिक्षा होणारच पाहिजे!” – रोहित पवार
“खरी माहिती बाहेर येऊ द्या, पोलिसांवर दबाव नको. जर आम्ही सांगितलेली माहिती चुकीची ठरली, तर माफी मागू. पण खरी माहिती लपवली गेली, तर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे!” – असा स्पष्ट संदेश
काय प्रश्न अजूनही अनुत्तरित?
- जखमी महिला कलाकार कोण?
- तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय का?
- बंदूक कोणाच्या परवान्याची होती?
- पोलिसांनी दबावाखाली जबाब घेतले का?