CM देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला हटके सेलिब्रेशन – पारनेरमध्ये रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद
पारनेरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निघोज कान्हूर पठार मंडळ आणि अष्टविनायक रक्तपेढी, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबिराला तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते झालं.
“बॅनर नाही, भेटवस्तू नाही – फक्त समाजसेवेचा संकल्प!” – फडणवीस यांच्या सूचनेनुसार शिबिराचं आयोजन करण्यात आलं. फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना पैशांची नासाडी न करता रक्तदान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी काम करण्याचं आवाहन केलं होतं.
या शिबिराला भाजपा नेते विश्वनाथ कोरडे, मंडळ अध्यक्ष किसनराव शिंदे, सचिन वराळ पाटील, राजाराम एरंडे, दिनेश बाबर, सोनाली सालके, अर्जुन नवले, अमोल मैड, मनोज ठोकळ, संग्राम पावडे, नीलेश थोरात यांसह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“रक्तदान हीच खरी मानवसेवा!” या भावनेतून भाजप कार्यकर्त्यांनी रक्तदान करत मुख्यमंत्रींच्या वाढदिवसाचं समाजोपयोगी स्वरूपात रूपांतर केलं.