‘भेसळ ओळखण्यास २८ मोबाइल व्हॅन’ ; मंत्री नरहरी झिरवाळ
अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात महिनाभरात २८ मोबाइल प्रयोगशाळा व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रयोगशाळा विभागनिहाय वितरित केल्या जातील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आणि विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. झिरवाळ यांनी शुक्रवारी विभागातील आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झिरवाळ म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागात्त मनुष्यबळाचा अभाव आहे. ४० टक्के जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी कार्यवाही लवकरच केली जाईल.