बावडी शिवारात लूट करणारे चार जण अटकेत – 5.55 लाखांचा मुद्देमाल जप्त!
शनिवार, 6 जुलै – पहाटे बावडी (श्रीगोंदा) शिवारात गायी व गोन्ह्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार अज्ञात इसमांनी अचानक हल्ला करत रोख रक्कम लुटली!

शनिवार, 6 जुलै – पहाटे बावडी (श्रीगोंदा) शिवारात गायी व गोन्ह्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार अज्ञात इसमांनी अचानक हल्ला करत रोख रक्कम लुटली!
“कत्तलीसाठी गायी नेताय!” असा बनाव करत मारहाण, दमदाटी आणि नंतर जबरदस्तीने लूट!
पिडीत – मिलिंद जोगदंड, वय ३९, रा. जातेगाव (पुणे)
श्रीगोंदा पोलिसांची वाजवी कारवाई – ४ आरोपी गजाआड!
गुन्हा उघडकीस आणणारे नावे –
अभिजीत बिटके (बिटकेवाडी)
नितीन भोस
राहुल साबळे
शाहरुख शेख
जप्त मुद्देमाल:
• ₹4.5 लाखांची पांढरी स्विफ्ट कार
• ₹60 हजार किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल
• एकूण मुद्देमाल – ₹5.55 लाख
ही संपूर्ण कारवाई SP सोमनाथ घार्गे, ASP प्रशांत खैरे, SDPO गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
टीममध्ये PI किरण शिंदे, PSI प्रभाकर निकम आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश!
पोलिसांची वेगवान कारवाई – गुन्हेगार आता गजाआड!