क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीदिनी आरपीआयच्या वतीने अभिवादन

अन्यायाविरोधात लढा देण्याचा व संघर्ष करण्याची प्रेरणा लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून मिळते - अमित काळे

           आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
           यावेळी आय.टी. सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, दया गजभिये, निखिल सुर्यवंशी, आबा पाचारणे, प्रविण वाघमारे, आशिष भिंगारदिवे, अजय पाखरे, युवा नेते संदीप वाघमारे, विशाल कदम, अक्षय गायकवाड, नितीन कसबेकर, श्रीकांत पाखरे, रुपेश पाटोळे, रोहन सदाफुले आद उपस्थित होते.

 

युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी अनेक क्रांतीकारक घडवले. ब्रिटीश राजवटीच्या अन्यायाविरोधात त्यांनी बंड केला. छत्रपती शिवरायांचे राज्य परत यावे आणि हा देश स्वातंत्र व्हावा यासाठी त्यांनी अनेक क्रांतीशाळा उभारल्या. अन्यायाविरोधात लढा देण्याचा व संघर्ष करण्याची प्रेरणा लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून मिळते. त्यांचा इतिहास युवकांसाठी स्फुर्ती देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब  करा .

आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे समवेत आय.टी. सेल संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, दया गजभिये, निखिल सुर्यवंशी, आबा पाचारणे, प्रविण वाघमारे, आशिष भिंगारदिवे, अजय पाखरे, युवा नेते संदीप वाघमारे, विशाल कदम, अक्षय गायकवाड, नितीन कसबेकर, श्रीकांत पाखरे, रुपेश पाटोळे, रोहन सदाफुले आदी.