क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

लहुजींचा खरा इतिहास युवकांनी जाणून घ्यावा -प्रा. माणिक विधाते

आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त सिध्दार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, गणेश बोरुडे, निलेश इंगळे, नंदा भिंगारदिवे, कैलास भोसले, संजय लोखंडे, साहेबराव पाचारणे, श्याम वैराळ, अनिल शेकटकर, प्रशांत चांदणे, संजय उमाप, बाबासाहेब राशीनकर, राहुल साबळे, बाळासाहेब विधाते, अशोक कराळे, राजेंद्र शिरसाठ, विठ्ठल उमाप, महादेव कोतकर आदी उपस्थित होते.

हे ही पहा आणि सबस्क्राईब  करा

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, देशभक्ती व शत्रूंपासून देशाचे संरक्षण हे लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारक घडविले. लहुजींचा खरा इतिहास युवकांनी जाणून घेतला पाहिजे. स्वातंत्र्याच्या क्रांतीचे महानायक म्हणून त्यांची प्रतिमा असून, अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची स्फुर्ती त्यांनी दिली. अनेक क्रांतीकारक घडवून ब्रिटीश राजवटीला धडा शिकवला. त्यांचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.