‘ग्रो मोअर’ घोटाळा : ११ बँक खात्यांतून तब्बल ८६५ कोटींची उलाढाल!
शिर्डीचा सावळे अजून ४ दिवस पोलीस कोठडीत

शिर्डीचा सावळे अजून ४ दिवस पोलीस कोठडीत
स्मार्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली स्मार्ट फसवणूक!
‘ग्रो मोअर’ नावाने गाजवलेली फसवणूक आता थेट ८६५ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यावर जाऊन थांबली आहे!
मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे (वय २७, रा. शिर्डी) आणि त्याच्या टोळीच्या नावावर असलेल्या ११ बँक खात्यांमधून ८६५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा मोठा आर्थिक खेळ आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाला आहे.
या कंपन्यांचा वापर:
ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स
ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिसेस
ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट
ग्रो मोअर स्वराज्य कॅपिटल
गुंतवणूकदारांकडून उभारले ५५३ कोटी!
– त्यापैकी ४५४ कोटी परत दिल्याचा दावा
– उरलेल्या पैशांतून शेअर मार्केटमध्ये ‘गुंतवणूक’ आणि ८१ कोटींचं नुकसान! – असं सावळ्याचं सांगणं
कोठडीचा कालावधी वाढला!
सावळेला अटक करून आधी ९ दिवसांची कोठडी, आता २९ जुलैपर्यंत आणखी ४ दिवसांची पोलीस कोठडी
सावळ्याच्या मालमत्तेचा तपास सुरू:
शिर्डीतील आलिशान घर
महागड्या गाड्या
प्लॉट्स
सोने… आणि अजून बरंच काही!
पैशांचा ‘ऑफ द रेकॉर्ड’ प्रवास:
तपासात आणखी एक मोठा बिनधास्त डेटा – १३ अनधिकृत खात्यांतून ९.६४ कोटींचे संशयास्पद व्यवहार!
“पैसा कुठून आला? कुठे गेला? कोणाच्या खात्यात पोचला?”
सर्व तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू.
ग्रो मोअर घोटाळा = गुंतवणूकदारांसाठी धोका!
नवीन नाव, मोठे वादे, आणि शेवटी फसवणूक – सावध राहा!