एलसीबीत “जुनी टीम” परतणार? ‘शंकर अंमलदार’ पुन्हा फॉर्मात!
एसपी घार्गे यांची भूमिका ठरणार निर्णायक

एसपी घार्गे यांची भूमिका ठरणार निर्णायक
अहिल्यानगर (मेट्रो टीम!)
LCB (स्थानिक गुन्हे शाखा) मध्ये पुन्हा एकदा ‘जुने तेच’ अंमलदार येणार का?
हा मोठा प्रश्न सध्या पोलीस दलात चर्चेचा विषय बनला आहे!
गेल्या ४-५ वर्षांपासून LCBमध्ये कोणत्याही अंमलदाराची नियमित नियुक्ती झालेली नाही.
जुनी टीम पुन्हा LCBत येण्यासाठी ‘फिल्डिंग’ सुरू असल्याचं समजतंय!
विशेषतः ‘शंकर’ नावाचा माजी अंमलदार आपली जुनी टीम पुन्हा आणण्यासाठी वरच्या लेव्हलवर लॉबिंग करत आहे!
पण पोलिस दलातूनच विचारलं जातंय –
नेहमीचेच चेहरे का? नवीन चेहऱ्यांना संधी का नाही?
सध्या LCBचा भार फक्त ‘संलग्न अंमलदारां’वर आहे.
त्यांच्याकडे नियुक्ती नसूनही ते काम करताहेत.
आता नव्या अंमलदारांची नेमणूक लवकरच अपेक्षित आहे.
अंदरखाने नाराजी वाढली आहे!
- “वशिला किंवा राजकीय पाठबळ नसेल तर LCBमध्ये संधी मिळत नाही!”
- “LCB म्हणजे मलिदा, त्यामुळेच जुने अंमलदार पुन्हा घुसायचा प्रयत्न करत आहेत!”
एसपी सोमनाथ घार्गे यांनी आता पावलं उचलणं गरजेचं!
त्यांनी नुकतीच LCB प्रभारीपदी किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती केली आहे.
पण सर्वांच्या नजरा आहेत, “जुनेच परत येणार की नवे कार्यक्षम अधिकारी संधी मिळणार?” या निर्णयावर!
पोलीस दलातून जोरदार आवाज:
“जुने ‘फिक्स’ अंमलदार नकोत!
नव्या, निष्पक्ष व कार्यक्षम अंमलदारांनाच LCBमध्ये संधी मिळाली पाहिजे!”
“LCBसारख्या संवेदनशील शाखेत ‘निष्पक्षता’ हवी, राजकीय खेळी नाही!”