हरिभाऊंचा १०० किमी ‘फिनिश लाइन’चा फत्ते!
पुणे ते बारामती ‘आरोग्यवारी २०२५’मध्ये अहिल्यानगरच्या धावपटूचा थरारक पराक्रम!
हरिभाऊंचा १०० किमी ‘फिनिश लाइन’चा फत्ते!
पुणे ते बारामती ‘आरोग्यवारी २०२५’मध्ये अहिल्यानगरच्या धावपटूचा थरारक पराक्रम!
अहिल्यानगर | ५ ऑगस्ट | मेट्रो न्यूज
“१०० किलोमीटर धावत फिनिशलाइन गाठणं म्हणजे केवळ शरिराची नव्हे तर मनगटाची ताकद!” – असं सिद्ध केलंय घोसपुरीच्या राजेंद्र ऊर्फ हरिभाऊ घोडके यांनी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या ‘आरोग्यवारी २०२५’ स्पर्धेत १०० किमी धावणारी ‘ओपन कॅटेगरी’ त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच हा गौरव पटकावला!
दगडूशेठ गणपती मंदिर, पुणे ते बारामती – तब्बल १०० किमी धावणं म्हणजे खेळ नाही!
स्पर्धेत राज्यभरातून ८५ स्पर्धक सहभागी झाले होते. या मार्गावर जेजुरीच्या चढण्या, मोरगावचा दमछाक घाट, दिवे घाटाचे वळणे – काहीच हरिभाऊंचा वेग थांबवू शकले नाही.
“फक्त पाय नाही, हिम्मतही धावत होती!”
धावण्यासोबतच फिटनेस आणि लोकप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या वारीत हरिभाऊंनी सर्वांचे लक्ष वेधले.
त्यांना यशस्वीतेसाठी अनुपम संकलेवा, हरिष काबरा, ललित लुणिया यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.
स्पर्धा संपल्यानंतर बारामतीत मोठ्या सन्मानाने त्यांचा सत्कार करण्यात आला.
हरिभाऊ म्हणजे ‘मॅरेथॉन मशीन’च!
त्यांच्या फिटनेस जर्नीचा मागोवा घेतला तर वाटतं – “हा माणूस धावण्यासाठीच जन्मलाय!”
टाटा मरेथॉन, मुंबई – ४२ किमी (२ वेळा)
लोणावळा अल्ट्रा मरेथॉन – ५० किमी (२ वेळा)
सातारा हिल रन – २१ किमी (२ वेळा)
खडकवासला अल्ट्रा – ५६ किमी
कास मरेथॉन – ६५ किमी
गणपतीपुळे रन, आपले पुणे, नगर रायझिंग, पंढरपूर वारी रन & सायकल वारी
… आणि अजूनही स्टॉप नाही!
घोसपुरीपासून ‘गौरवगाथा’पर्यंत – सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन!
त्यांचं हे यश पाहून एआरसी फिटनेस, एएस फिटनेस, अहिल्यानगर रनर क्लब, रामकृष्ण हरी सुप्रभात समूह, गिगाबाईट कॉम्प्युटर परिवार, तसेच केडगाव, चिखली, घोसपुरी आणि संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“शेवटी, पायांनी नाही – जिद्दीने अंतर पार केलं!”
#HaribhauGhode #ArogyaWari2025 #100KMChallenge #AhilyanagarPride #MarathonMan #MetroNewsExclusive

दगडूशेठ गणपती मंदिर, पुणे ते बारामती – तब्बल १०० किमी धावणं म्हणजे खेळ नाही!
“फक्त पाय नाही, हिम्मतही धावत होती!”
हरिभाऊ म्हणजे ‘मॅरेथॉन मशीन’च!
घोसपुरीपासून ‘गौरवगाथा’पर्यंत – सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन!
“शेवटी, पायांनी नाही – जिद्दीने अंतर पार केलं!”