आरोग्य व्यवस्था धोक्यात!

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर “मागण्या मान्य होईपर्यंत काम बंदच!”

🚨
आरोग्य व्यवस्था धोक्यात!

👉 राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी-कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर 💥
👉 “मागण्या मान्य होईपर्यंत काम बंदच!”

📍 अहिल्यानगर | पोलीस न्यूज नेटवर्क

जिल्हा रुग्णालयासह संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणारे कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत.

❗ आंदोलनामागील कारणं

  • २००५ पासून कंत्राटावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजूनही नियमित सेवा मिळालेली नाही 😡
  • शासनाने १४ मार्च २०२४ ला समायोजनाचा निर्णय घेतला, पण अंमलबजावणी अजून नाही ⏳
  • तुटपुंज्या मानधनावर काम, EPF, बोनस, ग्रॅज्युटी अशा मूलभूत सोयींचा अभाव 💰
  • सेवेत असताना मृत्यू किंवा अपघात झाल्यास सानुग्रह अनुदानाची मागणी 💉

📢 कर्मचाऱ्यांच्या ठाम मागण्या

  • दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्यांना कायम करण्यात यावं
  • वेतनात २५% वाढ 💸
  • अपघात/मृत्यूवर ५० लाख सानुग्रह अनुदान, अपंगत्वावर २५ लाख 🆘
  • सर्वांना EPF आणि गटविमा लागू करावा 🛡️
  • तात्काळ रिक्त पदांची जाहिरात करून समायोजन करावं

👉 कर्मचारी संघटनांचा इशारा – “मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही!”

⚡ पार्श्वभूमी

 

१०-११ जुलैला आझाद मैदानावर आंदोलन, आरोग्यमंत्री भेटले तरी तोडगा नाही.
आता १९ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा संप सुरू.