पेन्शनर शिक्षकांचा ऐतिहासिक दिल्ली दौरा – खासदार लंके यांच्या पुढाकाराने ‘गुरुवर्यांना’ नवा सन्मान!
शिक्षण क्षेत्रात आयुष्य झोकून देणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांसाठी खासदार निलेश लंके यांनी एक ऐतिहासिक आणि भावनिक पुढाकार घेतला आहे. तब्बल 200 पेन्शनर शिक्षकांना स्वतः दिल्ली दौऱ्यावर घेऊन गेले असून, त्यांच्या वेतन, पेन्शन आणि वैद्यकीय सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर थेट पंतप्रधान, अर्थमंत्री आणि खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दिल्लीकडे रेल्वेने रवाना होताना स्टेशनवरचा माहोल अगदी भावनिक! अनेक शिक्षक पहिल्यांदाच राजधानीला भेट देणार असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
“शिक्षक म्हणजे माझी प्रेरणा. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी मी सदैव काम करेन,” असं खासदार लंके यांनी नम्र शब्दांत सांगितलं. त्यांचे वडीलही शिक्षक असल्याने हा दौरा केवळ राजकीय नाही, तर वैयक्तिक भावनिक नात्यानेही जोडलेला आहे.
बन्सी उबाळे म्हणाले – “लंके साहेबांनी शिक्षकांसाठी घेतलेला पुढाकार म्हणजे मुलाने वडिलांसाठी उचललेली सामाजिक जबाबदारी!”
दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि खासदार शरद पवार यांच्याशी थेट संवाद साधून सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न मांडले जाणार आहेत.
या दौऱ्यात संसद, राष्ट्रपती भवनासह ऐतिहासिक स्थळांचाही आनंद लुटता येणार आहे. प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण जबाबदारी खासदार लंके यांच्याकडून.
शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून हे सांगता येतं – गुरुंचा सन्मान हीच खरी गुरुदक्षिणा!