शिक्षक बँकेची वार्षिक सभा ‘शांततेत’, पण राजकीय कुरघोड्यांचं नाट्य रंगतच राहिलं!
दरवर्षी गोंधळासाठी चर्चेत असलेली अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा यंदा अनपेक्षितपणे शांततेत पार पडली
शिक्षक बँकेची वार्षिक सभा ‘शांततेत’, पण राजकीय कुरघोड्यांचं नाट्य रंगतच राहिलं!
नगर | प्रतिनिधी
दरवर्षी गोंधळासाठी चर्चेत असलेली अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सभा यंदा अनपेक्षितपणे शांततेत पार पडली. यावेळी विरोधकांनी घेतलेली गोलमोल भूमिका आणि सत्ताधाऱ्यांसह सौहार्दाने वागणं चर्चेचा विषय ठरलं. त्यामुळेच वादावादीचा जुना ट्रॅक बदलला आणि सभा गाजली न विचारांनी… नाट्याने!
सभेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर यांनी बँकेच्या नावात बदल, राज्यभर कार्यक्षेत्र, शेड्युल बँक दर्जा अशा महत्त्वाच्या पोटनियमांना मंजुरी देण्याचं आवाहन केलं.
सुरुवातीस काही विरोधकांनी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला – प्रवीण ठोंबरे, विकास डावखरे, संजय धामणे यांनी चर्चा न घेता थेट मंजुरीवर प्रश्न उपस्थित केला. पण दुसुंगे, तापकीर आदींनी गोलाकार उत्तर देत वातावरण निवळवलं.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची भाषाच बोलल्याने सभासदांमध्ये “मैनेज झाले का?” अशी कुजबुज सुरू झाली.
विशेष म्हणजे प्रवीण ठुबे यांचं भाषण अपेक्षाभंग करणारं ठरलं. त्यांनी थोडा तुटपुंजा विरोध नोंदवला, पण अखेर सत्ताधाऱ्यांकडून टाळ्याही मिळाल्या.
डावखरे मात्र रोखठोक बोलले – “तुमचं असताना शांत, आता का गोंधळ?” अशी थेट टिका करत त्यांनी सभागृह तापवलं.
शिक्षक नेते बापू तांबे यांनी शांतपणे मुद्दे मांडले.
संजय कळमकर यांचं भावनिक भाषण गाजलं – “घर चांगलं चाललंय, बाहेरचे पाहुणे घेऊ नका,” असा सल्ला देत त्यांनी राजीनाम्याची भावना व्यक्त केली.
सर्व 14 विषय अखेर मंजूर झाले.
सभेत 80-85% सभासद सत्ताधारी गटाचेच असल्याने विरोध करून काहीच साध्य होणार नव्हतं, हे स्पष्ट होतं.
ठुबे आणि डावखरे यांच्यातली शाब्दिक खडाजंगी आणि सभासदांची करमणूक हेच यंदाच्या सभेचं विशेष ठरलं.
#TeacherBank #AnnualMeeting #PoliticsInCoop #AhmednagarUpdate #MetroLive
