“कारमध्ये सोडतो” म्हणत लुटणारे गँग अखेर जाळ्यात!
"छत्रपती संभाजीनगरला सोडतो" या बहाण्याने स्विफ्ट कार थांबवून प्रवाशाला चक्क चाकूचा धाक दाखवत लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ आणि रोख पैसे असा लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या 'फेक ट्रॅव्हल गँग' चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे!
“कारमध्ये सोडतो” म्हणत लुटणारे गँग अखेर जाळ्यात!
नेवासा फाटा ते छ. संभाजीनगर
“छत्रपती संभाजीनगरला सोडतो” या बहाण्याने स्विफ्ट कार थांबवून प्रवाशाला चक्क चाकूचा धाक दाखवत लॅपटॉप, मोबाईल, घड्याळ आणि रोख पैसे असा लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या ‘फेक ट्रॅव्हल गँग’ चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे!
आरोपींची नावं –
महेश शिरसाट (26)
गौरव शिरसाट (25) – दोघंही राहणार म्हसळे, नेवासा
जिल्हा गुन्हे शाखा आणि विशेष पथकाच्या चमूने सापळा रचून नागापूर फाटा येथे अटक केली.
कार, चाकू, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम – एकूण ₹6 लाखांचं सामान जप्त!
तांत्रिक विश्लेषण व सायबर ट्रेसिंगने मिळालेल्या माहितीच्या आधारावर आरोपींचा माग काढण्यात आला.
पो. निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि त्यांच्या चमूचं मोलाचं काम.
तरुणांनो, सावध राहा!
अनोळखी गाडीत प्रवास करताना काळजी घ्या. लिफ्ट देणारा प्रत्येकजण मदतीसाठीच असेलच असं नाही…
