संपूर्ण महाराष्ट्रात गड-किल्ल्यांना सायकल मोहीमेद्वारे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याच्या हेतूने या सायकलवारीचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी सतीश नाना सातव व डॉक्टर मगर यांनी दिली. सायकल रॅली द्वारे गडकोट किल्ल्यांची मोहीम राज्यामध्ये प्रथमच होत आहे.
महाराष्ट्रातील गडकोट किल्ले सायकलवर पूर्ण करण्याचा संकल्प करून देशाचे माजी कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती ते किल्ले शिवनेरी सायकल रँलीचे आज आयोजन करण्यात आले. ही रॅली किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्या जवळ आज दुपारी तीन वाजता आली असता रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुमारे तीनशे नव्वद किलोमीटर लांबीच्या या सायकल रँली मध्ये छोटी मुले, महिलांसह लहान-मोठे सुमारे ७० सायकलपटू सहभागी झाले होते. या सायकल रँलीचे आयोजन मुख्य संयोजक व तीन वेळा आयर्न मॅन चा किताब पटवणारे ज्येष्ठ सायकलपटू सतीश ननवरे, प्रशांतनाना सातव संजय दराडे, डॉ मगर आदींनी केले.
तसेच या सायकल मोहिमेमध्ये मुख्य संयोजक आयर्न मॅन सतीश ननवरे, डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रशांतनाना सातव, शरद पोखरकर, डॉ हेमंत मगर, संजय दराडे, डॉ प्रणेश वाघमोडे, ललित पटेल, रविंद्र थोरात, संतोष नेवसे, गणेश हिंगणे, पांडुरंग बलकवडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल पटूंसाठी तसेच उपस्थित असलेल्या संयोजक व मान्यवरांसाठी ज्येष्ठ वक्ते व इतिहास तज्ञ डॉ श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.