इंडियन आयडल च्या  सेशन १२ मध्ये अंजली गायकवाड चे कल्याणजींनी केले कौतुक  

रविवारचा शो आवर्जून पहा, आणि अंजलीला वोट करा 

 

या शनिवार-रविवार दि.१० व ११ एप्रिल रोजी होणाऱ्या इंडियन आयडाॅलच्या भागांमध्ये प्रत्येक स्पर्धकाचे एकच गाणे होणार आहे..!
विशेष म्हणजे या वेळच्या “कल्याणजी आनंदजी स्पेशल” भागासाठी एके दिवशी ज्येष्ठ संगीतकार श्रीमान आनंद जी उपस्थित रहाणार आहेत.  तर एके दिवशी सुप्रसिद्ध संगीतकार श्री.ए.आर.रहेमान उपस्थित राहणार आहेत.
आनंद जी यांचे समोर अंजलीने गायलेल्या गाण्याचा प्रोमो इथे देत आहे..

कौतुकाची गोष्ट म्हणजे,  या वेळेस खास उपस्थिती लाभलेले आॅस्कर पुरस्कार सन्मानित श्री.ए.आर.रहेमान यांना यावेळचे अँकर श्री.ऋतिक धनजानी यांनी जेव्हा “त्यांना कोणत्या शैलीचे (Genres) संगीत आवडते? वेळ मिळाला तर ते काय ऐकतात?” याविषयी विचारले.  तेंव्हा त्यांनी आपल्या अंजली आणि नंदिनी या दोघी बहिणींचा उल्लेख करुन “चित्तानंदासाठी” (Mind Relaxation) या दोघींचेही गाणे ते नेहमीच ऐकत असल्याचे सांगितले.  अंजली बरोबरच नंदिनीच्या शास्रीय गायकीचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

 

हे ही अवश्य पहा 

रसिकहो, आता सर्वच स्पर्धक ताकदीने आणि अप्रतिम गात आहेत. त्यामुळेच यापुढे स्पर्धा रंगतदार आणि चुरशीची होत जाणार आहे. परीक्षकानी विजेते पदाचा निर्णय संपूर्णतः रसिकांच्या व्होटिंग वर ठेवण्याचे ठरवले आहे. म्हणूनच अंजलीला व्होटिंगच्या रुपाने भरभरून आशिर्वाद द्यावेत.  आपणही व्होटिंग करीत रहा आणि इतरांकडून ही करवून घ्या.., ही विनंती..!

 

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in ► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD… ► Live updates on http://metronews.co.in/

Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/ ► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha ► Circle us on G+: https://plus.google.com/+metronewshttps://www.youtube.com/metronews