अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या बाबी

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांचे मालक आणि कामगार यांचे कोरोना लसीकरण बंधनकारक

*अत्यावश्यक सेवांमध्ये  असलेल्या बाबी*

१. रुग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधालय, औषध कंपन्या व अन्य वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवा.
२. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, दुग्धालये, बेकरी, कन्फेक्शनरी, अन्नपदार्थ विक्रीची दुकाने.
३. पेट्रोल पंप  आणि पेट्रोलजन्य पदार्थ
४. सर्व प्रकारच्या कार्बो सेवा

 

हे ही अवश्य पहा: 

 

५. डाटा सेंटर, क्लाउड सेवा पुरवठादार, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांना माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवणारे पुरवठादार.
६. खासगी व शासकीय सुरक्षा सेवा
७. सर्व प्रकारचे फळ विक्रेते
८. सार्वजनिक वाहतूक- करेन, टॅक्सी, ऑटो,व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
९. स्थानिक स्वराज्य संस्थांचे मान्सूनपूर्व बांधकाम
१०. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येत असलेल्या सर्व सार्वजनिक सेवा
११. सर्व प्रकारची माल वाहतूक
१२. कृषी विषयक सर्व सेवा
१३. ई -कॉमर्स
१४. मान्यता प्राप्त प्रसारमाध्यमांच्या सेवा
१५. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सर्व सेवा
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांच्या परिसरात सामाजिक अंतराचे पालन केले जाईल याची खबरदारी घेण्यात यावी. ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून पुरेशा सामाजिक अंतराचे पालन होण्यासाठी आवश्यक ठिकाणी मार्किंग करणे, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांचे मालक आणि सर्व कामगार यांचे कोरोना लसीकरण करवून घेणे बंधनकारक  असणार आहे.