जामखेडच्या वंजारवाडीचा शैक्षणिक चमत्कार – ड्रायव्हरच्या घरातून डॉक्टर होणाऱ्या ६ मुली! 

 वंजारवाडी (धा). इथे गेल्या ३ वर्षांत तब्बल ६ मुलींची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालीय! 

📚
🚀 जामखेडच्या वंजारवाडीचा शैक्षणिक चमत्कार – ड्रायव्हरच्या घरातून डॉक्टर होणाऱ्या ६ मुली! 💪🎓

जामखेड तालुक्यातलं एक छोटंसं गाव – वंजारवाडी (धा). इथे गेल्या ३ वर्षांत तब्बल ६ मुलींची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालीय! 🔥 हा काही साधा प्रकार नाही, तर मेहनत, चिकाटी आणि पालकांच्या त्यागाची कहाणी आहे. ❤️

गावातला श्री बाळासाहेब मिसाळ – रोज पिकअप टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे. पण शिक्षणाच्या बाबतीत? 📖 त्यांनी एकच मंत्र पाळला – “जमिनी विका, पण लेकर शिकवा!” 🌟 आणि त्यातून घडली प्रेरणादायी कथा.

त्यांच्या तिन्ही मुलांनी ग्रामीण भागात, सरकारी शाळेत शिकून वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेतली –
👩‍⚕ वैष्णवी बाळासाहेब मिसाळ – BAMS (अहिल्यानगर)
👨‍🔬 वैभव बाळासाहेब मिसाळ – IISER, भोपाल
👩‍⚕ वनश्री बाळासाहेब मिसाळ – MBBS (गव्हरमेंट मेडिकल कॉलेज, जळगाव)

आणि ही फक्त एका घराची गोष्ट नाही! 💥 वंजारवाडीतील इतरही मुलींनी दाखवून दिलं की, मोठं स्वप्न बघायला पैशाची नाही तर जिद्दीची गरज असते –
👩‍⚕ ऐश्वर्या आदिनाथ मिसाळ – BHMS
👩‍⚕ प्रतिक्षा आजिनाथ जायभाय – BAMS
👩‍⚕ अदिती आदिनाथ मिसाळ – BAMS
👩‍⚕ स्नेहा संतोष नागवडे – MBBS

🤯 एवढी मोठी कामगिरी असूनही, या मुलांनी खासगी क्लासचं तोंडसुद्धा पाहिलं नाही! रोज ३-४ किलोमीटर पायी चालत शाळा, खामगाव ZP शाळेत प्राथमिक, तर अरणगावमधील शाळेत माध्यमिक शिक्षण – आणि तरीही वैद्यकीय प्रवेशाच्या शर्यतीत टॉपर! 🏆

या यशाचं श्रेय जातं –
✅ पालकांच्या त्यागाला ❤️
✅ खामगाव ZP शाळेचे शिक्षक रामहरी बांगर सर व सहकारी 🙌
✅ श्री अरणेश्वर विद्यालय, अरणगावच्या मार्गदर्शनाला 📚

💬 वंजारवाडीच्या या मुलींची कहाणी आज सोशल मीडियावर व्हायरल होतेय, कारण त्यांनी दाखवून दिलं – “स्वप्न मोठं ठेवा, परिस्थिती नाही तर तुमची मेहनत ते पूर्ण करेल!” ✨

#वंजारवाडीचागौरव 🌟 #जामखेडटॅलेंट 💪 #ग्रामीणशिक्षण 🚜 #DoctorDreams 🩺 #InspirationForAll 💖