8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार “केजीएफ 2”

साम्राज्याला पुन्हा तयार करताना

 

केजीएफ (KGF) या  सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागाच्या  निर्मात्यांनी “केजीएफ 2” चे नवीन पोस्टर शेअर करत, टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.“केजीएफ 2” चा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. ही बातमी आल्यापासून केजीएफचे चाहते खूप उत्साही झाले आहेत.  या पोस्टरमध्ये  यश खुर्चीवर बसलेला आहे आणि तो खूप रागाने बघत आहे.  दिग्दर्शक प्रशांत नील यांनी पोस्टर शेअर करताना लिहिले होते की, ‘8 जानेवारीला सकाळी 10.18 वाजता साम्राज्याची झलक पहा. यासाठी कदाचित वेळ लागला असेल, परंतु आम्ही आणखी स्ट्रॉन्ग होऊ आला आहोत ‘यापूर्वी यशने चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये यशच्या तोंडात सिगारेट आहे आणि एका हाताने काहीतरी जड ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पोस्टर शेअर करताना यशने लिहिले होते की, ‘साम्राज्याला पुन्हा तयार करताना’ यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडनदेखील या चित्रपटात दिसणार आहेत.

 

चित्रपटात संजय खलनायक “अधीरा” आणि रवीना “नेते रामिका सेन”च्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल. चाहत्यांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त आणि यश हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ‘असं अजिबात वाटत नाहीये की, यश आणि संजू बाबा पहिल्यांदा एकत्र शूट करत आहेत. शूटींगदरम्यान दोघे चांगले मित्र  झाले होते. दोघांनीही शूटींग एन्जॉय केलं. दरम्यान,  8 जानेवारीचा दिवस खूप खास आहे कारण हा अभिनेता यशचा वाढदिवसही आहे.