वेदांताचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा अनंतात विलीन 

गेले दिगंबर ईश्वर विभुती , राहील्या त्या किर्ती जगामाजी

 

वारकरी संप्रदायाचे  भूषण, अखंड ज्ञानदानपरायण ,अभ्यासू  ,कट्टर हिंदुत्ववादी स्पष्ट व परखड वक्तव्याचा पुरस्कार करणारे ,विद्यार्थी मंडळीवर प्रेम करणारे श्रद्धेय वेदांताचार्य निवृत्ती महाराज  वक्ते बाबा हे आज ब्रह्ममुहूर्तावर श्रीविठ्ठलचरणी विलीन झाले आहेत.  वक्ते बाबांचे महत्वाच पर्व आज संपलं आहे. 

संप्रदायातील भीष्माचार्य म्हणून त्यांचा लौकिक होता. पंढरीतील चातुर्मासातील पाठ विद्यार्थ्यांना वैशिष्ट्यपूर्ण  पध्दतीने शिकवणारे हे महाविद्यालयच आज वारकरी शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी आज लोप पावलय.

आईसाहेब मुक्ताबाई महाराजांवर अपार निष्ठा असणारा हा महात्मा आज अचानक सर्वांना परका  करून गेलाय.  शेगाव जवळील टाकळी  हाट  येथे बाबांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त करण्यात आलीय.