मुंबई – राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषना केली. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 दिले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी 46000 कोटी रुपये तरतूद करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली गेली आहे. मात्र अजित पवारांच्याच अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेत खोडा घातला आहे. लाडकी बहीण योजना महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जाते. या खात्याला सहा वर्षांच्या अर्थसंकल्पात ३० हजार कोटी रुपये मिळाले. मग आता एकाच वर्षात लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी कुठुन आणायचे असा प्रश्न अजित पवारांच्या अर्थ खात्यातील असा प्रश्न अजित दादांच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे काँग्रेस सह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी राज्यात सुरू झाली असून, 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्मची मुदत आहे. सध्या राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला अर्ज दाखल करत आहेत. यापूर्वी महायुती सरकारने लेक लाडकी योजनाही सुरू केली आहे. त्यात मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत. पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात १ एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कन्येला हे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या योजनेवर राज्य सरकारला दरवर्षी सुमारे 125 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेवर पाच टक्के प्रशासकीय खर्च येणार असल्याचे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारवर 223 कोटी रुपये खर्चाचा अतिरिक्त बोजा ही पडण्याची शक्यता आहे कारण राज्यात आतापर्यंत सुमारे चाळीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहे. मंत्री अदिती तटकरे सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाचे खंडन केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आमच्या सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून यापूर्वी ४० हजार कोटींची तरतूद केली होती. आताही महीला भगिनींसाठी 46 हजार कोटी निश्चितपणे उभारू, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. म्हणून संतप्त होऊन ते खोटे आरोप करत आहेत दरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही या वृत्ताचे खंडन केले.
Prev Post