लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे 28 विद्यार्थी स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत
गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार!
अहिल्यानगर – हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेच्या गुणवत्ता यादीत रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी चमकले. शाळेच्या 60 विद्यार्थ्यांनी जिल्हा व शहर गुणवत्ता यादीत स्थान मिळवून, सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत 28, तर शहर गुणवत्ता यादीत 32 विद्यार्थी आले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या यशाबद्दल संस्थेचे उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य छाया काकडे, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदींसह शालेय शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा परीक्षेत बसविले जात आहे. यासाठी तज्ञ शिक्षक करत असलेल्या मार्गदर्शनाने विद्यार्थी विविध परीक्षेत यश मिळवत असल्याचे स्पष्ट केले. नवनाथ बोडखे म्हणाले की, ही प्राथमिक शाळा संस्थेत व राज्यात गुणवत्तेने नावाजली आहे. अनेक स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकत आहे. या शाळेने पुढाकार घेऊन रयतची एक स्पर्धा परीक्षा निर्माण करावी. त्याला संस्थेचे पूर्ण सहकार्य राहणार आहे. या शाळेचे गुणवत्तेबाबत असलेले वेगळेपण रोल मॉडेल म्हणून संस्थेत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. ज्ञानदेव पांडुळे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करुन सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख उर्मिला साळुंके, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभुले, रूपाली वाबळे, भाग्यश्री लोंढे, भारती सुरसे आदींचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, अर्जुनराव पोकळे, शौकतभाई तांबोळी यांनी अभिनंदन केले.
जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे –
इयत्ता पहिली –
जिल्ह्यात 6 वा क्रमांक- भोंडवे अपूर्वा अमोल, पवार सिद्धी अरुण, मोकाटे स्वरणीम जयदीप,
जिल्ह्यात 11 वा क्रमांक- कोहक सानवी नितीन, अनभुले स्वरव नारायण, गंभीरे आयुष योगेश, गारूडकर कैवल्य प्रदिप
इयत्ता दुसरी –
आराध्या रावसाहेब जाधव (जिल्ह्यात 3 क्रमांक), नाबगे विनय सचिन (जिल्ह्यात 6 वा), अंधारे वेदांत प्रमोद (जिल्ह्यात 8 वा), गुंजाळ रुद्र कैलास (जिल्ह्यात 9 वा), बारगजे भक्ती बळीराम (जिल्ह्यात 9 वा), ठाणगे गार्गी संतोष (जिल्ह्यात 11 वा), हंबर्डे शामवी अमोल (जिल्ह्यात 12 वा)
इयत्ता तिसरी –
शेख सरफराज शाकिर (जिल्ह्यात 7 वा), शिंदे सत्यजित विठ्ठल (जिल्ह्यात 13 वा), धामणे अनुष्का विलास (जिल्ह्यात 15 वा), पार्थ विक्रम जाधव (जिल्ह्यात 17 वा)
इयत्ता चौथी –
अनभुले अथर्व विकास (जिल्ह्यात 4 था), बोरुडे अर्णव भारत (जिल्ह्यात 5 वा), टकले कपिश मीनीनाथ (जिल्ह्यात 6 वा), बडवे ओवी अशोक (जिल्ह्यात 8 वा), कीर्ती प्रवीण शिरसे (जिल्ह्यात 9 वा), रक्ताटे श्रेया रवींद्र (जिल्ह्यात 12 वा), भद्रे स्वरा अजय (जिल्ह्यात 16 वा), जाधव आर्या रवींद्र (जिल्ह्यात17 वा), बनकर आरुषी मल्लिकार्जुन (जिल्ह्यात 20 वा), वरद बाबाजी झावरे (जिल्ह्यात 21 वा)