युवक शेतकरी वैभव कासार याला नांगरट करताना बिबट्याचे दर्शन

वनविभागाला कधी येणार जाग ?

अहमदनगर :

राहुरी तालुक्यातील दवनगाव येथील युवक शेतकरी वैभव कासार याला आपल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरट करत असताना चक्क बिबट्याचे दर्शन झाले.   तब्बल दीड एकराची नांगरट होईपर्यंत  बिबट्या  शोधण्यासाठी फिरत होता.

धाडसाने वैभव याने ट्रॅक्टर बंद न करता नांगरट पुर्ण करून आपल्या जीवाची सुटका केली आणि बिबट्याच्या हालचालींचे चित्रीकरण आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.

त्याच्या याधाडसाचे सर्व मित्र परिवारातून कौतुक होत आहे, मात्र या घटनेवरून पुन्हा वनविभागावर प्रश्न चिन्ह उभ राहील आहे.