अहिल्यानगर जिल्ह्यात लम्पीचा कहर! महिला पशुधन पर्यवेक्षक निलंबित!
आता गरज आहे वेगाने कार्यवाहीची आणि निष्काळजीपणा टाळण्याची!

अहिल्यानगर जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजार मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. 92% जनावरांचे लसीकरण झालं तरीही खराब हवामानामुळे आजार वाढतोय. आतापर्यंत 472 जनावर लम्पीने बाधित, 20 मृत्युमुखी पडले आहेत. पण वास्तविक आकडा खूप जास्त असण्याचा अंदाज!
राहाता तालुक्यात सगळ्यात जास्त केसेस असून, येथे पशुसंवर्धन विभागाकडून निष्काळजीपणा दिसून आला. याच कारणामुळे महिला पशुधन पर्यवेक्षक दर्शना सातदिवे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबित केलंय.
पशुसंवर्धन विभाग आता पुन्हा जोरशीर लसीकरण मोहिमा राबवत आहे. धुळे जिल्ह्यातून लस आणली जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून नव्याने लस विकत घेतली जात आहे.
राज्यात 13 लाखांहून अधिक गायवर्गीय जनावरे असून, लसीकरणाचे काम एप्रिलपासून सुरू आहे. मात्र काही भागांत लसीकरणात निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
आता गरज आहे वेगाने कार्यवाहीची आणि निष्काळजीपणा टाळण्याची!
#अहिल्यानगर #लम्पीआजार #पशुसंवर्धन #निलंबन #MetroPortal