धोनीच्या फार्म हाऊसच्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी!
१० एकर शेतीमध्ये उत्पादित ताजी फळे आणि भाज्या
क्रिकेटमध्ये नाव कमाविल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनी शेतीत रमला आहे. धोनीच्या फार्म हाऊसच्या उत्पादनांना बाजारात मोठी मागणी आहे. या भाज्या रांचीच्या बाजारपेठेत पोहोचताच लगेच विकल्या जात आहेत. धोनीने रांची येथील फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या फार्म हाऊसचे नाव ‘इजा’ आहे. त्याची पत्नी साक्षीचे जन्मस्थान असलेल्या उत्तराखंडमध्ये इजाचा शाब्दिक अर्थ आई असा आहे. या ‘इजा’च्या मुख्य गेटवर लिहिलेले आहे- ‘ग्रोइंग विथ लव्ह’, म्हणजेच प्रेमासह वाढ. धोनीच्या १० एकर शेतीमध्ये उत्पादित ताजी फळे आणि भाज्यांमध्ये स्ट्रॉबेरी, कोबी, टोमॅटो, ब्रोकोली, मटार, हॉक आणि पपई यांचा समावेश आहे. धोनीच्या फार्म हाऊसची उत्पादने परदेशातही पाठवली जात आहेत.