महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसची अहमदनगर विभागीय कार्यकारणी
विभागीय अध्यक्षपदी कमलेश गायकवाड यांची नियुक्ती
अहमदनगर
महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची नुकतीच निवड करण्यात आली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या अहमदनगर विभागीय कार्यकारिणीची बैठक नेवासा येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकित नूतन विभागीय कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
अहमदनगर विभागीय अध्यक्षपदी कमलेश गायकवाड, सचिव विष्णु घुले, संघटक सचिव अंबादास गोयेकर, कार्याध्यक्ष अनिरुद्ध चव्हाण, ब्रह्मदेव जायभाये, विभागीय उपाध्यक्ष प्रवीण तिरोडकर, सॅम्युएल साठे, खजिनदार विजय गवळी, लतीफभाई शेख, प्रसिद्धी प्रमुख डॅनियल कोल्हे, अण्णासाहेब थोरे, कार्यकारिणी सदस्य अशोक दाणे, शंकर सोनवणे, धनापुणे, गणेश पाठक, कुसळकर, वाघमारे, गजानन बुधवंत, शिवाजी भालेकर यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र एस.टी. काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी नूतन विभागीय अध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्यासह सर्व नूतन पदाधिकार्यांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.