सरकारचा वारी विरोध म्हणजे अस्मानी संकटाचा फायदा

मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेस पंढरपुरात येऊ देणार नाही- विवेक कुलकर्णी

                        विविध स्तरांवरील झालेल्या वारकरी बैठकीत असे निदर्शनास आले.शासनाने-प्रशासनाने वारकर्याच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली.सरकारने वारकर्यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. पंढरपुरातच झालेल्या मतदान प्रक्रियेच्या प्रचार सभांना कोरोनाची नियमावली लागू होत नव्हती का?सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासानाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत.

 

 

 

 

 

                             महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भररस्त्यात वारकर्यांचचे पारंपारिक गणवेश  व भगवा ध्वज उतरवायला लावून,हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणार्या,आदरणीय हरी भक्त पारायण निरपराध संताना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मा. मुख्यमंत्र्यांनी वारकर्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे.आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव,वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने,दर्शन या वरील प्रतिबंध दूर करावे.लवकरात लवकर सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास साधू संत व वारकरी यांच्यावरील अन्याय न थांबविल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही.असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

                               नगर येथे विश्व हिंदू परिषद आयोजित पत्रकार परिषदेत विवेक कुलकर्णी बोलत होते.या प्रसंगी भागवत व रामायणाचार्य वासुदेव महाराज खेडकर,कार्याध्यक्ष अँड जय भोसले,मिलिंद मोभरकर,जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गन्धे,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,सहमंत्री गौतम कराळे आदी उपस्तिथ होते. मानाच्या पालखी सोबत किमान ५० वारकर्यांना परवानगी द्यावी.वारकर्यांना अटक करून सरकार वारीची परम्परा खंडित करीत आहेत.असे सांगितले.जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी प्रास्तविक केले तर गौतम कराळे यांनी आभार मानले. १७ तारखेला सरकारला जाग येण्यासाठी विश्व हिंदू परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोनाचे नियम पाळून प्रतीकात्मक दिंडी काढून आंदोलन करेल.असा इशारा देण्यात आला आहे.