महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या – तिघा नराधमांची बळजबरी उघडकीस!
नाशिकमध्ये घडलेली एक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे.
BIG BREAKING | महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या – तिघा नराधमांची बळजबरी उघडकीस!

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिघा नराधमांनी त्रास देत, जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्याचबरोबर, तिचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी केली. या मानसिक छळाला कंटाळून पीडित मुलीने घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवलं
.
मृत विद्यार्थिनीवर झालेल्या अन्यायाची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यांनी सांगितलं की, आरोपी गणेश भांगरे (20, रा. रामटेकडी झोपडपट्टी, तपोवन), अक्षय मदन वरठे (21, रा. रामटेकडी झोपडपट्टी, तपोवन) आणि अतिष राजकुमार वैद्य (पूर्ण पत्ता माहित नाही) यांनी या मुलीला सातत्याने धमक्या देत, जबरदस्ती केली.
आरोपींनी पीडितेचा इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून, तिचे फोटो पसरवले. त्यात तिच्या गळ्यात हात टाकलेला फोटो पोस्ट करून “हा माझा बॉयफ्रेंड आहे” असं खोटं मजकूरासहित टाकलं. यामुळे मुलीची समाजात, कॉलेजमध्ये बदनामी झाली आणि ती प्रचंड मानसिक दडपणाखाली आली
.
इतकंच नव्हे, तर गणेश भांगरे या आरोपीने मुलीला फोनवर अश्लील भाषा वापरून शिवीगाळ केली. तिच्याविरोधात सोशल मीडियावरही अपमानास्पद मजकूर पसरवला. या सर्व प्रकारामुळे पीडितेवर मानसिक छळ झाला आणि शेवटी तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
“आमच्या मुलीवर जे झालं ते अक्षम्य आहे. या नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे. समाजात अशा गुन्हेगारांना जागा नाही.”
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या घटनेतून स्पष्ट होतं की – सोशल मीडियाचा गैरवापर, जबरदस्तीचे संबंध आणि महिलांवरील मानसिक छळ किती भयानक परिणाम घडवू शकतो.
आता फक्त एकच मागणी –
#MetroNews #Nashik #BreakingNews #JusticeForDaughter #StopHarassment #SocialMediaAbuse