रोहयोत मोठा गोंधळ! निकृष्ट कामांचा पाढा; ६६ कामांवर थेट चौकशीचा आदेश!

 काशिनाथ दाते यांचा थेट इशारा – “कामांचा दर्जा नसेल, तर कारवाई होणारच!”

🚨
 रोहयोत मोठा गोंधळ! निकृष्ट कामांचा पाढा; ६६ कामांवर थेट चौकशीचा आदेश!

🌐 काशिनाथ दाते यांचा थेट इशारा – “कामांचा दर्जा नसेल, तर कारवाई होणारच!”

📍 टाकळी ढोकेश्वर | पारनेर तालुका

पारनेर तालुक्यात रोजगार हमी योजनेतील कामांमध्ये प्रचंड अनागोंदी उघडकीस आली आहे. अपूर्ण, निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट राहिलेली कामं… ही बाब गंभीर असल्याचे सांगत आमदार काशिनाथ दाते यांनी थेट चौकशीचे आदेश दिले आहेत!


🧑‍⚖️ पंचायत समितीच्या बैठकीत घेतला आढावा:
पारनेरच्या पंचायत समिती सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आमदार दाते यांनी स्पष्ट सांगितलं –

“लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून कामं मंजूर झाली! आता प्रत्येक कामाचा तपास होणार!”


🛣️ काय नक्की गोंधळ?
▪️ जवळा – सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता फक्त ४ महिन्यात उखडला!
▪️ बाभुळवाडे – टेंडरच वेळेवर निघालं नाही, सरपंचाकडूनच उशीर
▪️ गाजरेझाप – रस्ता अर्धवट, कमी जाडीचा लेयर टाकला

भाजप नेते विश्वनाथ कोरडे यांनी ही कामं स्पष्टपणे हायलाईट करत कारवाईची मागणी केली आहे.


📋 ३१७ पैकी ६६ कामांवर विशेष चौकशी
तांत्रिक अधिकाऱ्यांसह महायुती पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासमवेत चौकशी टीम तातडीने कार्यान्वित होणार आहे. संबंधितांवर कारवाई नक्कीच होणार, असा दाट इशारा बैठकीत देण्यात आला आहे.


🗣️ आमदार दाते यांचा निर्धार:

“मी राज्याच्या रोजगार हमी योजनेचा सदस्य आहे. बंद पडलेली कामं पुन्हा सुरू करण्यासाठी शासनदरबारी लढणार!”


 

🌳 बैठकीत आमदार दाते यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितीत होते –
विश्वनाथ कोरडे, विक्रमसिंह कळमकर, सुषमा रावडे, राहुल शिंदे पाटील, दयानंद पवार, ग्रामविकास अधिकारी आणि तालुक्यातील सरपंच मंडळी.