अकोले-देवठाण रोडवर मोठी धडक कारवाई! साडेचार लाखांची दारू जप्त!
"दारूवाल्यांची गाडी थेट पकडली!"

अकोले-देवठाण रोडवर मोठी धडक कारवाई! साडेचार लाखांची दारू जप्त! 
“दारूवाल्यांची गाडी थेट पकडली!”
राज्य उत्पादन शुल्क विभागाची अकोलेमध्ये आज सकाळी कमालीची अॅक्शन – सुमारे ₹4.5 लाखांची देशी-विदेशी दारू आणि डस्टर गाडी जप्त! 
घटना कुठे?
अकोले-देवठाण रस्त्यावरील तांभोळ शिवार
जप्त मुद्देमाल:
- देशी दारू ‘बॉबी संत्रा’ – 1,164 बाटल्या
- विदेशी दारू ‘रॉयल चॅलेंज’ + ‘रॉयल स्टॅग’ – एकूण 70 बाटल्या
- Renault Duster (MH 05 BS 8546)
एकूण किंमत – ₹4,48,990/-
गाडी थांबवली आणि तपासणी केली, तर सगळं दारूचं दुकान गाडीत भरलेलं!
कोण अडकलं?
सचिन सुदाम जाधव (रा. पोखरी बाळेश्वर, संगमनेर)
गुन्हा दाखल – दारूबंदी कायदा 1949 कलम 65(अ), (ई), 98(2)
काही दिवसांपूर्वीच याच्यावर कारवाई झाली होती, आता पुन्हा पकड!
ही अॅक्शन घेतली कुणी?
राज्य उत्पादन शुल्क विभाग, संगमनेर
मार्गदर्शन: डॉ. राजेंद्र देशमुख, सागर धोमकर, प्रमोद सोनोने
प्रमुख अधिकारी – निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे आणि त्यांची दमदार टीम 
विशेष उल्लेख – महिला जवानांचाही मोठा सहभाग! (सरस्वती वराट, स्वाती फटांगरे, प्रणाली दिघे आणि इतर टीम)
दारूबंदी चळवळीचे योद्धे हेरंब कुलकर्णी यांचं या कारवाईला समर्थन!
“अवैध दारू विक्रेत्यांवर कडक अॅक्शन सुरूच राहावी!” – अशी प्रतिक्रिया
एकूण किंमत – ₹4,48,990/-