मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठी कलाटणी – प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित निर्दोष!

२००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १० जणांचा मृत्यू आणि १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात तब्बल १६ वर्षांनी आता न्यायालयाचा निकाल लागला आहे आणि तो अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.

🧨
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठी कलाटणी – प्रज्ञा ठाकूर आणि कर्नल पुरोहित निर्दोष! ⚖️

२००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १० जणांचा मृत्यू आणि १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात तब्बल १६ वर्षांनी आता न्यायालयाचा निकाल लागला आहे आणि तो अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.

मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने भाजप माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे.

👉 न्यायालयाने स्पष्ट केलं की सरकारी वकिलांकडून आरोप सिद्ध करता आले नाहीत, त्यामुळे सर्व आरोपींना शंकेचा फायदा देण्यात आला.

👉 UAPA (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा) या प्रकरणाला लागू होत नाही, असंही कोर्टाने सांगितलं.

👉 ज्यामध्ये स्फोट झाला ती बाईक प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचा दावा सिद्ध झाला नाही. उलट, त्या या घटनेच्या २ वर्षांपूर्वीच संन्यासी झाल्या होत्या आणि त्यांनी भौतिक जीवनाचा त्याग केला होता, असं न्यायालयाने निरीक्षणात नमूद केलं.

👉 ‘अभिनव भारत’ या कथित संघटनेने स्फोटासाठी निधी वापरल्याचा आरोपही पुराव्याअभावी फेटाळला गेला.

👉 कर्नल पुरोहित यांनी RDX वापरून बॉम्ब तयार केला, हा दावा देखील ठोस पुराव्याशिवाय ठरला.

या खटल्याचा तपास सुरुवातीला ATS करत होती. त्यांनी जानेवारी २००९ मध्ये पहिलं आरोपपत्र दाखल केलं. एप्रिल २०११ मध्ये पूरक चार्जशीट आली. पण याच वर्षी गृह मंत्रालयाने तपास NIA कडे दिला.

या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा निर्णय न्याय मिळाल्यासारखा वाटतोय, तर काहींना यात राजकारणाचा वास येतोय.

 

📢 तुमचं मत काय?
👇 कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पोस्ट शेअर करा!