कुडाळमध्ये आढळला उडणारा बेडूक: मलबार ग्लायडिंग फ्रॉग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मलबार ग्लायडिंग फ्रॉग या दुर्मीळ बेडकाचे दर्शन झाले आहे. कुडाळ तालुक्यातील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज ॲन्ड लाइफटाइम हॉस्पिटल’मध्ये एका वन्यजीवप्रेमीला हा बेडूक आढळला. सामान्यतः पावसाळी हंगामात आढळणारा हा बेडूक डिसेंबर महिन्यात दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मलबार ग्लायडिंग फ्रॉग हा पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असलेला बेडूक आहे. हवेत उडत जाणारा बेडूक म्हणून याची ओळख आहे. दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्येच प्रामुख्याने याचा अधिवास आहे. कुडाळ तालुक्यातील धामापूर परिसरातही याची नोंद झाली आहे. मात्र, १ डिसेंबर रोजी ‘मायक्रोबायोलॉजी लॅब टेक्निशियन’ पदावर काम करणाऱ्या जागृती सावंत यांना या ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’चे दर्शन झाले.