काँग्रेसनेते विनायकराव देशमुख बिहार निवडणुकीचा प्रचार करताना चक्क मिठाईच्या प्रेमात    

अहमदनगर :

बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवारांचा  प्रचार करण्यासाठी काँग्रेसनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनायकराव देशमुख प्रचारात चांगलेच रमले आहेत. बिहार मध्ये प्रचार करता करता ते बिहारच्या संस्कृतीचा एक भाग असलेल्या ताज्या मिठाईच्या प्रेमात रममाण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

बिहार राज्यातील  नालंदा इथल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या रवीज्योती कुमार यांचा ते सध्या ते प्रचार करीत आहेत. त्यांच्या प्रचार करीत असताना नुकतीच त्यांनी एक पत्रकार घेतली आणि उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केलय. दमदार भाषण शैलीने त्यांनी तिथल्या मतदारांची मने जिंकली आहेत.
तिथं मुक्कामाला असताना त्यांनी आपला एक अनुभव शेअर केला आहे. ते म्हणालेत, राजगिर हे बिहारमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. नालंदा विद्यापीठ, वीरायतन, जैन मंदीर, जरासंध का आखाडा, जपानी मंदीर,स्वर्ण भांडार, वेनुवण, पंडुपोखर,गरम पाण्याचे चार कुंड, बिंबीसार जेल,अजातशत्रू किल्ला, पिप्पला लेणी,मणियार मठ हि येथील ठळक वैशिष्ट्ये आहेत. कोरोनामुळे यापैकी अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी सध्या खुली नाहीत,
या स्थळांच्या जवळच  “हाँटेल सिध्दार्थ ” येथे माझी निवासाची व्यवस्था आहे.पर्यटन स्थळ असल्यामुळे जैन ,मारवाडी पद्धतीच्या जेवणाची  दर्जेदार व्यवस्था आहे. त्यामुळे माझ्या आवडीचे जेवण मला मिळते. जवळपास आठ दिवसापासून इथेच असल्यामुळे माझी आता या बहुतांश मंडळींशी चांगली ओळख झाली आहे. त्यामुळे काही निवांतक्षणी वेळ मिळेल तसा, मी त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्यांची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
अशापैकीच एक म्हणजे ‘हर हर महादेव मिष्टांन्न भांडार’ .इथला फक्कड चहा प्यायला लोक लांबुन येतात. दररोजची ताजी मिठाई हे इथले वैशिष्ट्य. सकाळी बनविलेली मिठाई संध्याकाळ पर्यंत संपलेली असते.
पेढे, गुलाबजाम, मलाईबर्फी, खाजा, चुरमा ,जिलेबी यासोबतच गरमागरम मसाला दुध असा दररोज बदलता मेनु असतो. सकाळी मी चहाला त्याच्याकडेच जातो. त्याचवेळी विचारुन ठेवतो, ” आज क्या बना रहे हो ” , मग त्याच्या उत्तरानुसार माझे  ‘मिठाईग्रहणाचे नियोजन’ निश्चित होते.एवढं वर्णन केल्यावर तुम्हाला वाटेल “भारीच दुकान दिसतय.”  भारी वगैरे काही नाही, अगदी साधं टपरीछाप दुकान आहे. पण रोजची विक्री किमान पन्नास हजार रुपये तरी असेल., मात्र दुकानाच्या मालकाच्या कष्टाला तोड नाही. सकाळी सात पासुन रात्री ९.३० पर्यंत पठ्ठ्या दुकानातच असतो.
दुध आटवणे, खवा तयार करणे, पेढे बांधणे, गुलाबजाम बनविणे. हि सगळी कामे स्वतः करतो. हाताखाली दोन तीन मदतणीस आहेत.मात्र या माणसाचे कष्ट पाहील्यावर वाटते, आपण तर काहीच कष्ट करत नाही.
आज या माणसाला म्हटलं , “तुमचा एक फोटो घेऊ का ? त्याने आनंदाने संमती दिली असं त्यांनी आपला अनुभव शेअर करताना सांगितलं आहे.