“मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं; राधाकृष्ण विखे पाटील ठरले ‘संकटमोचक’!”

नगर | मुंबईच्या आझाद मैदानावर तब्बल 5 दिवस सुरू असलेलं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आज अखेर संपलं.

“मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं; राधाकृष्ण विखे पाटील ठरले ‘संकटमोचक’!”

नगर | मुंबईच्या आझाद मैदानावर तब्बल 5 दिवस सुरू असलेलं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आज अखेर संपलं. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष मैदानावर येऊन जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्यांवर सहमती दर्शवत अध्यादेश देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या हस्ते उपोषण सोडलं.

🚩
27 ऑगस्टला अंतर्वली सराटीतून सुरू झालेला हा लढा, शिवनेरीवरून घेतलेल्या शपथेने आणि 29 ऑगस्टला आझाद मैदानावर सुरू झालेल्या आमरण उपोषणाने महाराष्ट्राला थरारून टाकलं होतं. मुंबई अक्षरशः ठप्प झाली, सरकार गोंधळलं, आणि शेवटी मोठ्या हालचाली सुरू झाल्या.

राज्य सरकारने यासाठी खास मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली होती. अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं. पाच-सहा बैठकांनंतर आज निर्णायक क्षण आला आणि जरांगे पाटील यांनी थेट विखे पाटील यांच्याच हस्ते उपोषण सोडून त्यांचं कौतुक केलं.

👉 जरांगे पाटील म्हणाले –
“सरकारने मोठा निर्णय घेतलाय. पण उद्या काही दगा झाला, तर मी थेट विखे पाटील यांच्या घरी जाऊन बसेन!”

⚡ लाखो मराठा बांधवांनी उपोषण स्थळ शांततेत सोडलं. पण या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं –
मराठा पेटला तर राज्य हलतं, आणि शिस्तीत उभा राहिला तर इतिहास घडतो!