मराठी भाषेच्या गौरवात वृत्तपत्र व वाहिन्यांचे योगदान महत्वपूर्ण_ प्रा.डॉ. माहेश्वरी गावित
अ.नगर जिल्हा वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनी वाचकांचा सन्मान सोहळा
नगर – जगभरात आणि प्रामुख्याने भारतात मराठी भाषेचा प्रचार ,प्रसार व बोलणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मराठी साहित्य बरोबरच सातत्याने वाचले जाणारे वृत्तपत्र व पाहिल्या जाणाऱ्या मराठी वाहिन्या यांना मराठी मनांनी आनंदाने आपलेसे केले आहे. जगभरात सहा हजार बोली भाषा पैकी तीन हजार भाषा लुप्त झाल्या असून प्रत्येक पंधरा दिवसाला एक भाषा संपत आले. अशा परिस्थितीत मराठी बोलणाऱ्यांची संख्या आज साडेबारा कोटी आहे आणि ती सतत वाढत आहे. या आशादायक परिस्थितीसाठी मराठीच्या गौरवात सातत्याने वाचले वृत्तपत्र, साप्ताहिके मासिके व मराठी वाहिन्यांची भूमिका व योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याच्या अभ्यासिका व लेखिका प्राचार्य डॉक्टर माहेश्वरी गावित यांनी केले.
अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात प्रसिद्ध साहित्यिक वि.वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून लेखक वाचक स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक ,उपाध्यक्ष अनंत देसाई ,संचालक प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी, , किरण आगरवाल, कवी चंद्रकांत पालवे ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.
वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी प्रास्ताविकात मराठीचा गौरव दिन आपण साजरा करताना प्रत्येकाने मराठी बोलण्याचा, वाचण्याचा व लिहिण्याचा आग्रह धरणे आवश्यक आहे. वाचनालय सातत्याने उगवत्या पिढीला “रसिक वाचक” म्हणून घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी उपाध्यक्ष अनंत देसाई, कवी चंद्रकांत पालवे यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमास रसिक वाचक मंगेश साठे ,किशोर गांधी, अविनाश रसाळ ,विक्रांत साठे, मनोज मुनोत, नंदकिशोर आढाव, निर्मला खिलारी, पत्रकार सतीश डेरेकर ,श्री सुरकुटला प्रभाकर यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी यांनी केले .कार्यक्रमास वर्षा जोशी, संकेत पाठक, संजय गाडेकर , निखिल ढाकणे,बाबा सिकंदर आदी उपस्थित होते.