BIG BREAKING | अहिल्यानगरमध्ये गुटख्याचा महाभंडार पकडला!
गुन्हेगारीवर एसपी सोमनाथ घार्गे यांचा मोठा घाव तब्बल ८ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त १२ ट्रक सुपारी + १ ट्रक तंबाखू = पोलिसांची जबरदस्त कारवाई
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोली गाव शिवारात काल रात्री पोलिसांनी अशी धडक कारवाई केली की सगळ्यांचे डोळे थक्क झाले! क्राईम ब्रँचने तब्बल १३ ट्रक जप्त केले – त्यात १२ ट्रकमध्ये सुपारी (२०० टन, किंमत ६ कोटी १७ लाख रुपये ) आणि एका ट्रकमध्ये तंबाखू (किंमत १५ लाख रुपये) असा एकूण ८ कोटी ४३ लाखांचा माल मिळाला.
हा सर्व माल कर्नाटकहून थेट दिल्लीकडे रवाना होणार होता. पण अहिल्यानगर पोलिसांनी वेळेत धडक दिल्यामुळे हा काळाबाजार उघड झाला.
पत्रकार परिषदेत एसपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले –
“हा सर्व मुद्देमाल मावा बनवण्यासाठी जात होता. चालक व सोबतच्या लोकांकडे विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. वास्तव माहिती न दिल्यामुळे सर्व ट्रक जप्त करण्यात आले असून, संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. केंद्रीय जीएसटी व एफडीआय विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.”
यावेळी क्राईम ब्रँचचे पोनि किरणकुमार कबाडी, पोउपनि राजेंद्र वाघ, तसेच तपासी टीममधील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे – यापूर्वीही जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि नगर शहरात मावा कारखान्यांवर धडक कारवाई करून पोलिसांनी मोठे धाडस दाखवले आहे. तरीही या गुटखा माफियांचे हात अजूनही लांब असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या मालाची चौकशी आता केंद्रीय एजन्सींसोबत केली जाणार आहे. मोठ्या राजकीय-आर्थिक गाठोड्यांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Metro News अपडेट –
ही कारवाई दाखवते की, अवैध गुटखा-मावा व्यवसाय किती प्रचंड प्रमाणावर सुरू आहे. कायद्याच्या कचाट्यातून बचावण्यासाठी हे माफिया राज्यांच्या सीमेपलीकडे डावपेच रचतात, पण पोलिसांची धडाकेबाज अॅक्शन त्यांना गाठतेच!
तुमचे मत काय? पोलिसांनी अजून कठोर शिक्षा करावी का? की हा माल केवळ “बड्या लोकां”चा खेळ आहे?