MEGA KITCHEN ALARM! श्री गंगागिरी महाराज सप्ताहात ‘खिचडीचा महास्फोट’
तब्बल *५ लाख भाविकांसाठी २५० क्विंटल शाबुदाणा, २२५ क्विंटल बटाटे, १०० क्विंटल भगर!
MEGA KITCHEN ALARM! श्री गंगागिरी महाराज सप्ताहात ‘खिचडीचा महास्फोट’ – तब्बल *५ लाख भाविकांसाठी २५० क्विंटल शाबुदाणा, २२५ क्विंटल बटाटे, १०० क्विंटल भगर!
सरालाबेट | श्रीरामपूर | मेट्रो न्यूज नेटवर्क
गोदाकाठावर चालू आहे एक भव्य अध्यात्मिक पर्व! श्री गंगागिरी महाराजांच्या १७८व्या सप्ताहात यंदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे – “मेगा किचन”!
श्रीरामपूर आणि वैजापूर तालुक्याच्या सीमेवरील शनिदेवगाव येथे ३८० एकर जागेवर सुरु असलेल्या या सप्ताहात, तब्बल ५ लाख भाविकांसाठी खिचडीचा महाप्रसाद दिला जात आहे – तोही फक्त एकाच दिवशी, म्हणजे श्रावण एकादशीला!
काय आहे खास?
२५० क्विंटल शाबुदाणा
१०० क्विंटल भगर
२२५ क्विंटल बटाटे
१५० क्विंटल शेंगदाणे
२० क्विंटल मिरच्या
१२५ डब्बे तेल
हे सगळं साहित्य सोमवारी रात्रीपासूनच ट्रॉलींमध्ये भिजवले जात आहे आणि ट्रॅक्टरने मंडपांपर्यंत पोहोचवलं जातंय.
‘MEGA किचन’ मध्ये काय चाललंय?
या भव्य स्वयंपाकगृहात ३५० हून अधिक स्वयंपाकी आणि स्वयंसेवक गेले ८ दिवस सातत्याने भाकर-आमटी आणि भात-भगर भाविकांना देत आहेत. यामागची प्रेरणा म्हणजे महंत रामगिरी यांचं नेतृत्व आणि ग्रामस्थांची एकजूट!
४० वर्षांची परंपरा!
“आमचं कुटुंब ४० वर्षांपासून सप्ताहात भोजन सेवा देतंय. आमचं भाग्यच आहे!” – शुक्लेश्वर शिंदे
कोणतं गाव कुठे एकत्र आलं?
शनिदेवगाव, कमालपूर, भामाठाण, चेंडूफळ, नेवरगाव, नागमठाण, बाजाठाण – पंचक्रोशीतील गावांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
खासदार-आमदारांकडूनही मदत!
खासदार संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरणारे यांनी किराणा, शाबुदाणा, भाजीपाला आणि इतर साहित्य पुरवलं आहे.
फोटो,
व्हिडीओ, आणि रील तयार करायला विसरू नका – हीच ती बातमी आहे जी सगळी जनता “शेअर” करणार!

काय आहे खास?
‘MEGA किचन’ मध्ये काय चाललंय?
४० वर्षांची परंपरा!
कोणतं गाव कुठे एकत्र आलं?
खासदार-आमदारांकडूनही मदत!