भारतीय नौदलात ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ चा समावेश 

मुंबई :

भारतीय नौदलासाठी  MH-60 रोमियो हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे. अमेरीकन कंपनी लॉकहिड मार्टिनने  शुक्रवारी भारतीय नौदल दिनानिमित्त  ‘MH-60 रोमियो या हेलिकॉप्टर’चा फोटो शेअर केला होता. 

हिंद महासागरात चीनचं सामर्थ्य वाढलं आहे. चीनची वाढती ताकद पाहता भारताने अमेरीकन कंपनी लॉकहीड मार्टिनशी संपर्क करुन या हेलिकॉप्टर साठीचा करार केला आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीला 24 हेलिकॉप्टर बनवण्याची ऑर्डर दिली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात अपग्रेडेड हेलिकॉप्टर असणार आहे. यामध्ये असे काही फिचर्स आहेत, जे यापूर्वी कोणत्याही लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये पाहायला मिळाले नव्हते. अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर आधीपासूनच करत आहे.

 

हे हेलिकॉप्टर खास नौदलासाठी डिझाईन केलं जात आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यात आणि ते त्या पाणबुड्या नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक असे रडार आहेत ज्याद्वारे खोल समुद्रात लपलेल्या पाणबुड्या शोधता येतील आणि त्यांना लक्ष्य करुन त्या उद्ध्वस्त करता येणार आहे.