अहमदनगरमध्ये जनावरांना लागणार परवाना 

अहमदनगर
नगर शहरात दूध देणारे  प्राणी पाळण्यासाठी आता महापालिकेचा परवाना असणे बंधनकारक झालं आहे.  महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने शहरातील गायी, म्हशींच्या गोठ्यांची माहिती मागवली असून ,गोठा मालकांना परवाना दिला जाणार आहे.  परवाना न घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.  शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी  महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत.  महाराष्ट्र पशु अधिनियम २०१२ ची अंमलबजावणी  करण्यासाठी कोंडवाडा विभागाकडून जोरदार हालचाली आता सुरु झाल्या आहेत.  २ तारखेला पालकमंत्री नगर शहरात आले असताना शहराचे आमदार संग्राम जगताप  यांनी  जनावरांच्या प्रश्नांवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडल होत.   त्यावर आता त्वरित मनपाकडून कारवाई होत असल्याचे चित्र नगरमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.